• नाव नोंदणी अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०२४ पर्यंतच    Register Now
  • अधिक माहीतीसाठी उत्कर्ष पतसंस्था किंवा ८६८७१००१००
  • विविध गुणदर्शन स्पर्धा दोन गटात आयोजित केली आहे:

    गट क्र. १
    • वैयक्तिक: वय वर्षे ६ ते १२
    गट क्र. २
    • वैयक्तिक: वय वर्षे १२ ते पुढे
    सांघिक गट
    • वय वर्षे ६ ते पुढे (किमान ५ व्यक्ती सहभागी)

नियमावली

  • स्टेजवर सादर होऊ शकतील असे (नृत्य / गायन / चित्रकला / नाट्य / एकपात्री / वाद्यवादन / मिमिक्री / योगा इ.) कलाप्रकार स्पर्धक सादर करू शकतात.
  • स्पर्धा वैयक्तिक व सांघिक अशा दोन गटात स्पर्धा होतील.
  • ११ डिसेंबर २०२४ पूर्वी नावनोंदणी झालेल्या स्पर्धकांनाच फक्त सहभाग घेता येईल. ऐनवेळी आलेल्या कोणासही स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
  • कला सादरीकरणाकरिता वैयक्तिक गटासाठी ३ ते ४ मिनिटे व सांघिक गटासाठी ४ ते ५ मिनिटांचा कालावधी असेल.
  • स्पर्धकाने प्रत्येक कला प्रकारची माहिती (SYNOPSIS) कला सादरीकरणापूर्वी तीन प्रतीत परीक्षकांकडे द्यावी.
  • वादन, गायन तथा इतर तांत्रिक कलाप्रकार असल्यास आधी तशी सूचना संयोजकांना द्यावी. आवश्यक असलेल्या वस्तू लावणे अथवा तांत्रिक गोष्टीकरिता केवळ तीन मिनिटे वेळ देण्यात येईल.
  • कलेतील नाविन्य, सादरीकरणातील कौशल्य, चपळता, आवाज, नृत्यशैली, रंगसंगती, वेशभूषा, वापरलेले साहित्य, कलाकुसर यावर गुण अवलंबून असतील.
  • स्पर्धकाने दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे व आयोजकांनी केलेल्या स्लॉटप्रमाणे क्रमाने सादरीकरण करणे स्पर्धकास बंधनकारक राहील. स्पर्धकाने त्याच्या सोयीनुसार कोणत्याही वेळेस सादरीकरण घेण्यास आग्रह करू नये.
  • सादरीकरण AUDIO TRACK वर असल्यास रजिस्ट्रेशन करतेवेळी TRACK जमा करावा.
  • भंडारा, तेल, आग, कपूर, मेणबत्ती अशा हानिकारक गोष्टींचा वापर टाळावा.
  • एका व्यक्तीला वैयक्तिक अथवा सांघिक दोहोंपैकी एकाच गटात एकदाच सादरीकरण करता येईल.
  • रजिस्ट्रेशन झालेनंतर जर एखाद्या कला प्रकारच्या जास्त एंट्री असतील तर त्याची वेगळी स्पर्धा घेतली जाईल. (उदा. नृत्य/गायन वैयक्तिक)
  • निवडलेला संघ व वैयक्तिक कलाकारांना वाई फेस्टीवलच्या भव्य व्यासपीठावर सादरीकरणाची संधी देण्यात येईल.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  • वरील नियमात बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे राखून ठेवण्यात आले आहेत.

Loan

सोनेतारण कर्ज

10% P.A

वाहन तारण कर्ज

10.50% P.A

घरबांधणी कर्ज

11% P.A