एकरक्कमी ठेव ठेवून प्रतिमहिना व्याज देणारी हि ठेव योजना आहे.
ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मिळणाऱ्या पेन्शन रक्कमेप्रमाणे या योजनेचा लाभ घेता येतो.
वरील योजनेप्रमाणे दिलेल्या व्याजदरामध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग, आजी माजी सैनिक, विधवा यांना अर्धा टक्का ज्यादा व्याजदर मिळेल.
- मासिक व्याज ठेव खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास मोबाईल बँकिंग app द्वारे RTGS / NEFT / Funds trasnfer आणि dth recharge संबंधित सेवा सुलभरित्या करता येईल.
- ज्येष्ठ नागरिक , अपंग व गरजूंना बँकिंग घरपोच सुविधा.
- भारतभर डी डी सुविधा.
- कोअर बँकिंग.
- सर्व शनिवार कामकाज सुरु
- तीन फोटो.
- रहिवाशी पुरावा.
- ओळखपत्र पुरावा.
- सज्ञान व्यक्तीच्या नावे सदर ठेव ठेवता येईल.
- ठेव हि एका व्यक्तीच्या अथवा संयुक्त नावे ठेवता येईल.
- वरीलप्रमाणे निश्चित केलेल्या योजनेत ठेव ठेवल्यानंतर ग्राहकास जर काही कारणास्तव ठेव मुदतपूर्ण परत करावयाची असेल तर ठेवीच्या त्या वेळी झालेल्या मुदतीचा विचार करून संस्थेचा त्यावेळी त्यासाठी असणाऱ्या व्याजदरापेक्षा दोन टक्के कमी व्याजदराने व्याज देणेत येईल.
- तीस दिवसापेक्षा कमी कालावधी मध्ये जर ठेवीदारास सदर योजनेतील गुंतवणूक बंद करावयाची झाल्यास सदर ठेवीच्या रक्कमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
- या योजनेत ठेवलेल्या गुंतवणुकीस मुदत पूर्ण होवून १५ दिवसापेक्षा आधीक मुदत झाल्यास वरील दिवसांसाठी सदर गुंतवणुकीच्या मुदतपूर्ण मिळणाऱ्या रक्कमेवर बचत ठेवीच्या चालू व्याजदाराप्रमाणे ज्यादा व्याज आकारणी करून रक्कम मिळेल.
- या योजनेत ठेवलेल्या गुंतवणुकीस मुदत पूर्ण होवून १५ दिवसापेक्षा कमी दिवस झाले असतील तर त्यास कोणतेही ज्यादा व्याज आकारणी करता येणार नाही. मुदत पूर्ण झालेनंतर मिळणारी रक्कमच ग्राहकास दिली जाईल.