savings-deposit
project

संस्थापक- कै.आनंद कोल्हापुरे


उत्कर्षची शान, उत्कर्ष चा अभिमान, आदर्श चेअरमन, वाई भूषण, शिव छत्रपती पुरस्कार विजेते स्वर्गीय मा आनंद कोल्हापुरे.

ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेल्या वाई या गावात सामाजिक कार्याने प्रेरित असलेले व्यक्तिमत्व म्हणजे कै आनंद कोल्हापुरे.

स्वतः टेबल टेनिसचे राष्ट्रीय खेळाडू असल्याने व खेळाविषयी आत्मीयता असल्याने सुदृढ व सशक्त पिढी घडविण्याच्या उद्देशाने सामाजिक भावनेतून ११९२ साली “ वाई जिमखाना ” या क्रीडा संस्थेची स्थापना केली.

समाजकारण आणि राजकारणात अग्रेसर असलेले आण्णा, गोर-गरिबांना आर्थिक सहकार्य करता यावे यासाठी कायम प्रयत्नशील होते.

कर्तृत्व, नेत्तृत्व, वक्तृत्व यांचा अगम्य संगम असणारे व्यक्तिमत्व १२ मे २०१६ साली काळाने हिरावून नेले. त्यांच्या प्रेरणेमुळे उत्कर्ष पतसंस्थेचे सुरु असलेले कामकाज हे उत्तरोउतर प्रगती पथाकडे चालू आहे.

अर्थकरणातही काही तरी करूयात या भावनेने १९९९ साली आनंद कोल्हापुरे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी एकत्र येऊन अवघ्या ६००००/- रुपयांच्या भाग भांडवलावर १० बाय १० च्या छोट्याश्या गाळ्यात स्थापना केली “ उत्कर्ष पतसंस्थेची ”- समाजाच्या विकासासाठी सहकार हि संकल्पना उत्कर्ष पतसंस्थेने ध्येय, निष्ठा, सातत्य, विश्वास, इमानदारी या पंचसूत्रीचा वापर लोकोपयोगी व समाज हिताची कामे करण्यासाठी केला आहे.

संस्थेचे आर्थिक व्यवहार झपाट्याने वाढू लागले. सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचा संस्थेप्रती वाढणारा विश्वास पाहता अगदी कमी कालावधीतच उत्कर्ष पतसंस्था स्वमालकीच्या व भव्य वस्तुत स्थलांतर झाली.

project
  • १९९९

    उत्कर्ष पतसंस्थेची अतिशय छोट्याश्या गाळ्यात स्थापना, संस्थेला नोंदणी पत्र देताना वाई चे त्या वेळचे सहाय्यक निबंधक श्री डी एस साळुंखे यांनी “आम्ही एका चांगल्या संस्थेला जन्म दिला आहे ” असे उद्गार काढले होते.

  • २००२

    वाई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५०० चौ फुट असलेली जागा २००१ साली खरेदी केली. संस्थेला त्या वेळी एवढी रक्कम भरून जागा खरेदी करणे शक्य नसल्याने मा आनंद कोल्हापुरे यांनी स्वताच्या खिश्यातील पैसे घालून सदरची जागा खरेदी केली आणि अखेर उत्कर्ष पतसंस्था हि स्वतःच्या हक्काच्या सर्व सोयी सुविधांनी युक्त अश्या जागेत ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाली.

  • २००४

    ग्राहकांसाठी विनाभाडे LOCKERS सुविधा सुरु करून सुरक्षिततेची जाणीव उत्कर्षने घराघरात पोहोचवली.

  • २००६

    ग्राहकांच्या आग्रहापोटी यशवंतनगर शाखेची स्थापना केली.

  • २००८

    वाई मधील कलाकारांना व्यासपीठ व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वाई तालुक्यातील सर्वात भव्य दिव्य अश्या “ वाई फेस्टिवल ” ची सुरवात केली.

  • २०१०

    १० कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पूर्ण.

  • २०११

    महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने बचत गटांची स्थापना केली. २५०० पेक्षा अधिक महिलांना या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात आले. कर्ज परतफेड करण्याच्या उद्देशाने महिलांना वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले.

  • २०१४

    नाबार्ड कडून बचत गटांसाठी १ कोटीचे अर्थसहाय्य मिळवले. नाबार्ड कडून अर्थसहाय्य मिळवणारी एकमेव संस्था.

  • २०१५

    पाचवड शाखेची स्थापना. कोअर बँकिंग सुविधा प्रारंभ.

  • २०१७

    मोबाईल app. सातारा जिल्ह्यातील पहिली कॅशलेस पतसंस्था.

  • २०१९

    सातारा व शिरवळ शाखेची स्थापना.

  • २०२२

    QR कोड सुविधा.

  • २०२३

    पाचगणी, कराड , बारामती, कोल्हापूर व पुणे शाखेची स्थापना.