सामाजिक उपक्रम

वाई फेस्टिवल :
आपली संस्था विविध सामाजिक उपक्रम घेण्यात अग्रेसर आहे . वाई फेस्टिवल हा कार्यक्रम वाईमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. वाईतील कलाकारांना चांगले व्यसपीठ मिळाले आहे . नृत्य स्पर्धा, बालचित्रकाला स्पर्धा शरीर सौष्ठव स्पर्धा असे अनेक उपक्रमांचे आयोजन वाई फेस्टिवल मध्ये केले जाते . वाई फेस्टिवलच्या सर्व कार्यक्रमांना वाईकर प्रचंड संख्येने हजेरी लावतात. वाईतील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या सहकार्यामुळे वाई फेस्टिवल यशस्वी होते. उत्कर्षांच्या सौजन्याने आतापर्यंत वाई फेस्टिवल न भूतो न भविष्यती असा झाला आहे. आतापर्यंत वाई फेस्टिवल करीत कुशल बद्रिके,हेमांगी कवी,चिन्मय उदगीरकर,संकर्षण कराडे,सुनील तावडे,विजय पटवर्धन,मधुरा गोंधळेकर,मृण्मयी गोंधळेकर,शैला टिके,तन्वी पालव,जुईली जोगळेकर,रेश्मा कुलकर्णी, महेश कंठे,प्रल्हाद जाधव यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी वाईकरांचे मनोरंजन केले. तसेच फेस्टिवल मध्ये रकतदान शिबीर, पतंजली यॊग शिबीर घेतले जाते. नवनवीन संकल्पना घेऊन साकार झालेला वाई फेस्टिवल अद्वितीय होतो.

शरीर सौष्ठव स्पर्धा :
वाई जिमखाना हि उत्कर्ष पतसंस्थेची सहसंस्था आहे. दरवर्षी या संस्थेमार्फत जिलास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केली जाते. सदर स्पर्धेस तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर :
वाई जिमखाना हि उत्कर्ष पतसंस्थेची सहसंथा आहे. वाई जिमखाना येथे दररोज योगा, मल्लखांब, रोप मल्लखांब, जिमनॅस्टिक आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. अनेक गरजू व गरीब खेळाडूंकरिता वाई जिमखाना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. या संस्थेचे दरवर्षी उंन्हाळ्यात क्रीडा प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाते. सदर शिबिरास १५० हुन अधिक खेळाडूंचा सहभाग नोंदवला जातो. वाई जिमखान्यात दरवर्षी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले जातात.

सार्वजनिक गणेशोत्सव सुंदर सजावट स्पर्धाः
संस्थापक कै. आनंद कोल्हापुरे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सार्वजनिक गणेषोत्सव सुंदर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सदर स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळतो , स्पर्धेचे परिक्षण तज्ञ व्यक्तींमार्फत केले जाते. पारदर्शक निकाल हे या स्पर्धेचे खास वैशिष्ठ आहे. सदर स्पर्धेचा बक्षीस समारंभ हा दरवर्षी वाई फेस्टिवल ला हजारो प्रेक्षकांसमोर भव्य रंगमंचावर केला जातो.

महिला मेळावाः
महिला सबलीकरणा अंतर्गत आत्तापर्यंत गरजू व निराधार अशा हजारो महिलांना संस्थेने अत्यंत कमी दरात व्यवसाय वाढीसाठी कर्ज उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभे केले. उदबत्ती, मेणबत्ती, काडेपेटया तयार करणे, पिशव्या व पर्स शिवणे, चिक्की व इतर खादयपदार्थ तयार करणे, कपडे शिवणकाम, टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे. अशा कमी भांडवलात होणारे व्यवसाय मार्गदर्षन व प्रशिक्षण मोफत दिले. त्यासाठी लागणारे साहित्य दिले , प्रमाणपत्रे व भेटवस्तूही दिल्या गेल्या.
शिवाय वरील सर्व उत्पादनांची विक्री व मार्केट मिळावे म्हणून संस्थेने त्यांचे अनेक वेळा प्रदर्शनही भरविले. महिलांसाठी हळदी कुंकू सभारंभ व महिला दिन अंतर्गत महिलांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान, आरोग्य तपासणी ठेवली जाते. व अनेक क्षेत्रात उतुंग कामगिरीकरणा-या महिलांचा सत्कार केला जातो.