उत्कर्ष पतसंस्थे विषयी

१९९९ साली मा. श्री. कै. आनंदराव कोल्हापुरे यांनी स्थापन केलेली उत्कर्ष नागरी सहकारी पतसंथा अगदी कमी कालावधीत २००२ साली स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर झाली. वाई सारख्या छोट्या शहरात स्थापन झालेल्या उत्कर्ष पतसंस्थेला संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळाला महाराष्ट्र्रतील अनेक संस्थांचे पदाधिकारी संस्थेचे कामकाज पाहण्यास येतात. समाजाच्या विकासासाठी सहकार हि संकल्पना उत्कर्ष पतसंस्थेने ध्येय, निष्ठा, सातत्य, विश्वास, इमानदारी या पंचसूत्रीचा वापर लोकोपयोगी व समाज हिताची कामे करण्यासाठी केला आहे.

२००६ ला यशवंतनगर शाखा आणि २०१५ ला पाचवड शाखेची स्थापना करून उत्कर्ष पतसंस्थेने खेड्यापाड्यातील लोकांचा उत्कर्षप्रति असणारा विश्वास सार्थ ठरवला. २०१४ – १५ ला उत्कर्ष पतसंस्था हि नाबार्ड करून अर्थसहाय्य मिळवणारी देशातील पहिली पतसंस्था आहे. Crisil Rating BB Stable असणारी पतसंस्था आहे. तसेच पतसंस्थेच्या कामकाजाची वेळ सकाळी ९ ते रात्रो ९ पर्यंत अशी सलग १२ तास असल्याने सर्वसामान्य व नोकरदार ग्राहकांकरिता उत्कृष्ट प्रकारची सेवा देऊन करून उत्कर्ष पतसंस्थेचे वेगळेपण जपले आहे. विनभाडे लॉकर्स सुविधा हि योजना उत्कर्षाची वेगळेपणाची ओळख सार्थ ठरवत ग्राहकांचा उत्कर्षप्रति असणारा विश्वास दृढ करत राहिली आहे. सहकार आणि आधुनिकता याची योग्य सांगड घालत उत्कर्ष पतसंस्थेने Core Banking प्रणाली सुरु केली त्याचबरोबर SMS Banking, Mobile App, NEFT, RTGS, Fund Transfer, Mobile DTH Recharge या सोयी सुरु करून राष्ट्रीय बँकेच्या बरोबरीने वाटचाल केली आहे.

कार्यक्षम व निरपेक्ष वृत्तीने व्यवस्थापन हि आमच्या संस्थेची खरी ओळख असल्याने व सामाजिक जाणिवेतूनच उत्कर्षचा जन्म झाल्याने सुरवातीपासूनच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना उत्कर्ष पतसंस्था हि कायम प्राध्यान देत आहे. २०१६ – १७ या आर्थिक वर्षात उत्कर्ष पतसंस्थेने दुष्काळ ग्रस्थांसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ” नाम ” फौंडेशनला सामाजिक कृतज्ञा निधी दिला आहे. तसेच महिला स्वावलंबनाकरिता उत्कर्ष पतसंस्थेने २५०० महिलांना महिला सबलीकरण कर्ज योजनेअंतर्गत कर्ज वाटप केले आहे. वाई फेस्टिवल, रोटरी, वाई जिमखाना व उत्कर्ष पतसंस्था हि सामाजिकता, क्रीडा विविधता व अर्थव्यवहार यांचा त्रिवेणी संगम आहे. संस्था स्थापनेपासून सतत ऑडिट ” अ ” वर्ग, सलग ७ वर्ष १५ % लाभांश हि संस्थेची खास वैशिष्टये आहेत. संस्थेच्या उत्कृष्ट वाटचालीमुळे गेल्या ७ वर्षात संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत . सन २०११ – १२ व सन २०१२ – १३ यशवंतराव चव्हाण आदर्श पतसंस्था पुरस्कार, सन २०१२ ला अविष्कार फौंडेशनतर्फे आदर्श चेअरमन पुरस्कार, सन २०१४, २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ ला बँको पुरस्कार, सन २०१६ ला सहकार सुगंध वार्षिक अहवाल द्वितीय क्रमांक पुरस्कार, २०१८ ला उत्कृष्ट पतसंस्था व दीपस्तंभ पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी उत्कर्ष पतसंस्था सम्मानित झाली असून पतसंस्थेच्या चालू असलेल्या उत्कृष्ट कामाची पोहोच पावतीच आहे.

उत्कर्ष पतसंस्थेचे संस्थापक मा. कै . आनंदराव कोल्हापुरे हे कर्तृत्व, नेत्तृत्व, वक्तृत्व यांचा अगम्य संगम असणारे व्यक्तिमत्व १२ मे २०१६ साली काळाने हिरावून नेले. त्यांच्या प्रेरणेमुळे उत्कर्ष पतसंस्थेचे सुरु असलेले कामकाज हे उत्तरोउतर प्रगती पथाकडे चालू आहे.

संचालक मंडळ

Adhyaksha

up-Adhyaksha