उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था
१९९९ साली मा. श्री. कै. आनंदराव कोल्हापुरे यांनी स्थापन केलेली उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था अगदी कमी कालावधीत २००२ साली स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर झाली. वाई सारख्या छोट्याश्या शहरांत स्थापन झालेल्या उत्कर्ष पतसंस्थातेला संपूर्ण नावलौकिक मिळाला. महाराष्ट्रातील अनेक संस्थेचे पदाधिकारी संस्थचे कामकाज पाहण्यास येतात. समाजाच्या विकासासाठी सहकार हि संकल्पना उत्कर्ष पतसंस्थेने ध्येय, निष्ठा, सातत्या, विश्वास, इमानदारी या पंचसूत्रीचा वापर लोकउपयोगी व समाज हिताची कामे करण्यासाठी केला आहे.